आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणजे ‘मासूम बच्चा’ लिहून दिले तसे बोलतात, आझम खान यांनी उडवली खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदाऊन - समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जोरदार खिल्ली उडवली. राहुल म्हणजे निरागस मुलगा असून त्यांना लिहून दिलं तसे ते बोलतात, असे ते म्हणाले.
योगगुरू रामदेवबाबाही त्यांचा बच्चा असाच उल्लेख करतात; पण मी त्यांना निरागस मुलगा म्हणेन. कारण त्यांना जे काही लिहून दिले असेल, ते तसेच वाचतात. उत्तर प्रदेशच्या एका जाहीर सभेत लाकडाच्या वखारीला ते प्लायवूड फॅक्टरी म्हणाले होते, असा दावाही आझमखान यांनी केला. बदाऊन येथील अल्पसंख्याक समुदायातील एका कुटूंबातील पाच जणांची हत्या झाली होती. त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी आझमखान शुक्रवारी रात्री येथे आले होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकारच दंगली घडवते, असा आरोप राहुल यांनी केला होता.
यासंदर्भात छेडले असता आझमखान यांनी काँग्रेसवरच प्रत्यारोप केला. दंगलीचा पाया काँग्रेसनेच रचला होता. गेली पन्नास वर्षे काँग्रेस सत्तेवर असून त्यांनीच अनेक दंगली घडवल्या आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे सांगून अखिलेश यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे काम न झाल्यास सरकारमधून सर्वप्रथम बाहेर पडेल, असे ते म्हणाले.