आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीच्या मंत्र्यांनी निकाहच्या 16 वर्षांनंतर केले होते रजिस्ट्रेशन, 110 दिवसांनी झाले रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री मोहसिन रजा यांच्या अडचणी वाढू शकतात. रजा यांच्या निकाहचे रजिस्ट्रेशनची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने रद्द ठरले आहे. तथापि, याप्रकरणी मंत्र्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द झालेले नाही. यासंदर्भात लवकरच सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील. निकाहच्या 16 वर्षांनंतर मंत्रिमहोदयांनी रजिस्ट्रेशन केले होते, जे 110 दिवसांनी रद्द झाले.

 

सीएम योगींनी केले होते लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष (भाजप)चे सरकार बनताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात लग्नाचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य केले होते. मुस्लिम संघटनांकडून सरकारच्या या पुढाकाराला विरोध होत असतानाच वक्फ आणि हज मंत्री मोहसिन रजा यांनी चार ऑगस्टपासून आपल्या निकाहचे रजिस्ट्रेशन करून चर्चेत आले होते. परंतु आता त्यांचा रजिस्ट्रेशन अर्ज रद्द झाला आहे.

 

यामुळे रजिस्ट्रेशन झाले बाद
निश्चित वेळेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांचा अर्ज रद्द ठरला आहे. आता मंत्र्यांना नव्याने पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. मंत्री मोहसिन रजा यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटले की, निकाहचे रजिस्ट्रेशन रद्द झालेले नाही. कायद्यानुसार, तीन महिन्यांच्या आत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु व्यग्र कार्यक्रमांमुळे ते प्रमाणपत्र घेऊ शकले नाहीत. याप्रकरणी पुढील आवश्यक कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...