बलरामपूर- उत्तर प्रदेशात उद्यान विभागाचे राज्यमंत्री शिवप्रताप यादव यांच्या मुलास शनिवारी जमावाने बेदम मारहाण केली. राकेश यादव असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बलरामपूर जिल्ह्यात नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना ही घटना घडली.
भाजपचे समर्थक के. डी. शुक्ल यांच्या बूथ एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईविरोधात शुक्ल यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याचदरम्यान खलवा पोलिस ठाण्याजवळ मंत्रिपुत्र राकेश यादव यास जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्यास नाल्यात फेकून जमावाने पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली.