आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत 16 पैकी 14 महापालिकांवर भाजप; नगरपालिकेत 198 पैकी 101 अध्यक्षपदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासाठी ही प्रतिष्‍ठेची निवडणूक आहे. - Divya Marathi
मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासाठी ही प्रतिष्‍ठेची निवडणूक आहे.

लखनऊ- लोकसभा विधानसभेतील यशाची मालिका कायम राखत भाजपने उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत माेठे यश मिळवले. १६ पैकी १४ मनपांवर भाजपने ताबा मिळवला. तर दाेन मनपात बसपाला यश मिळाले.  


नगराध्यक्ष निवडणुकीत १९८ पैकी १०१ जागा भाजपने पटकावल्या. समाजवादी पक्षाला ३६ तर बसपाला ३५ जागांवर यश मिळाले. दरम्यान, राज्यात प्रथमच ७ महापालिकांत महिला महापौर विराजमान होत आहेत. सपा व काँग्रेसला महापालिकेत खातेही उघडता आले नाही. लखनऊमध्ये १९६० पासून प्रथमच संयुक्ता भाटिया यांच्या रूपाने महिला महापौर निवडून अाल्या. विशेष म्हणजे अलाहाबाद मनपात शिवसेनेचा एक नगरसेवक दीपेश यादव हे विजयी झाले.


विरोधकांचे डोळे उघडले - योगी

गुजरातमध्ये भाजपला पराभूत करून सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचे उत्तर प्रदेशातील पालिका निवडणूक निकालामुळे डोळे उघडले आहेत. आपल्या हक्काच्या मतदारसंघात अमेठीतच या पक्षाला एकही जागा मिळू शकलेली नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी म्हटले आहे.

 

नगरपालिका:

पक्ष निकाल (198/198)
भाजप 100
सपा 37
बसपा 35
काँग्रेस 03
अन्‍य 23

 

नगर पंचायत:

पक्ष निकाल (74/438)
भाजप 32
सपा 24
बसपा 13
काँग्रेस 03
अन्‍य 02

 

एकूण किती जागांवर निवडणूक
- 16 महापालिका: एकूण 1300 वॉर्ड
- 198 नगरपालिका: एकूण 5261 वॉर्ड
- 438 नगर पंचायत: एकूण 5446 वॉर्ड 

 

3 टप्‍प्‍यांमध्‍ये 53% मतदान
- पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये 52.59%, दुस-या टप्‍प्‍यात 49.3% तर तिस-या टप्‍प्‍यामध्‍ये 58.65% मतदान झाले.
- तिनही टप्‍प्‍यात एकूण 53% मतदान झाले.


गुजरात निवडणुकीपूर्वी योगींची परीक्षा
- गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्‍तर प्रदेशची पालिका निवडणूक मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीसाठी योगी आदित्‍यनाथ यांनी 14 दिवसांत 32 सभा घेतल्‍या होत्‍या. त्‍यांनी फक्‍त लखनऊमध्‍ये 9 सभा घेतल्‍या होत्‍या. आपल्‍या निवडणूक प्रचाराची सुरुवात त्‍यांनी अयोध्‍येपासून केली होती.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, लखनऊला 100 वर्षांनंतर मिळाली पहिली महिला महापौर, भाजपच्‍या संयुक्‍ता विजयी आणि पाहा VIDEO बॅलेट पेपरसोबत निघाल्‍या 10-10च्‍या नोटा...

 

 

 


 

 

बातम्या आणखी आहेत...