आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP Police Inhuman Face Pictures From Lucknow GPO

वृद्धाला अमानूष मारहाण करून टाइपरायटर तोडणारा इन्स्पेक्टर सस्‍पेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशात 'कुंपनच शेत खात' असल्याचे दिसत आहे. एका वृद्धाला अमानूष मारहाण करून त्याचे टाइपरायटर तोडणार्‍या इन्स्पेक्टरला तडकाफडकी निलंबित (सस्पेंड) करण्‍यात आले आहे. एसएसपी राजेश पांडे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून दोषी इन्स्पेक्टरला कठोर शिक्षा करण्‍यात येणार असल्याचे म्हणले आहे.

सोशल मीडि‍यावर शनि‍वारी इन्स्पेक्टचे वृद्धाला अमानुष मारहाण करतानाची फोटो व्हायरल झाली होती. तसेच आमची सहयोगी वेबसाइट 'दैनिक भास्कर डॉट कॉम'ने या प्रकरणाला वाचा फोडली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन इन्स्पेक्टरवर निलंबनाची कारवाई केली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राजशेखर व एसएसपी यांनी पीडि वृद्धाच्या घरी जाऊन त्यांना टाइपरायटर दिला.

जिल्हाधिकारी राजशेखर यांनी वृद्धाला दिला नवा टाइपरायटर
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकारी राजशेखर यांनी शनिवारी रात्री पीडित वृद्ध कृष्‍ण कुमार यांच्या घरी जाऊन त्यांना नवा टाइपरायटर भेट दिला. याशिवाय दोषी इन्स्पेक्टरवर कठोर कारवाई करण्‍याचे आश्वासन देखील दिले. यावेळी एसएसपी राजेश पांडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी इंग्लिश व हिंदी दोन्ही भाषेतील टाइपराटर घेऊन गेले होते. मात्र, पीडित कृष्‍ण कुमार यांनी फक्त हिंदी भाषेतील टाइपरायटरचा स्वीकार केला.

सचिवालय बाहेरील पोलिस चौकी प्रभारी प्रदीप कुमार हे जीपीओ चौकात पोहोचले आणि रस्त्या दोन्ही बाजुला असलेले दुकानांची तोडफोड करायला लागले. एका वृद्ध टायपि‍स्‍ट कृष्‍ण कुमार यांचे टाइपरायटर उचलून जमिनीवर आपटले. कुष्ण कुमार यांनी इन्स्पेक्टरचे हातपाय जोडले. परंतु, त्याने कुठलीही दयामया दाखवली नाही. इन्स्पेक्टरने रस्त्याच्या बाजुला असलेल्या चहावाल्याचेही भांडे रस्त्यावर फेकले. इतकेच नव्हे तर रस्त्यावर पोटभरणार्‍यांना धमकावले.

इन्स्पेक्टर प्रदीप कुमार यांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचे लखनौचे एसएसपी राजेश पांडे यांनी कबूल केले आहे. इन्स्पेक्टरला असे करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. सीओ हजरतगंज अशोक कुमार वर्मा हे याप्रकरणी चौकशी करत आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, पोलिस इन्स्पेक्टरचा 'प्रताप' व सोशल मीडियावर शेअर झालेले फोटो...