लखनऊ - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) या वर्षी 27 मार्चला भारताला पोलिओ मुक्त घोषित केले होते. त्याला सहा महिने होत नाही तर, उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एका बालकात पोलिओची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बालकामध्ये पोलिओची लक्षणे आढळली असली तरी, त्याला पोलिओच झाला आहे, की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याची स्टूल चाचणी झाल्यानंतरच याबद्दलची सत्यता समोर येईल. बालकाला वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हरदोईच्या फिरोजपूर येथील घटना
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील फिरोजपूरयेथील सुधीर यांचा मुलगा विकास याला बुधवारी बरे नव्हते. ते त्याला घेऊन हरदोई येथील हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याच्यामध्ये पोलीओची लक्षणे आढळल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी बालकाच्या वडीलांना बोलावून त्याची अधिक तपासणी करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्याचे स्टूल्स तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
बालकाच्या डाव्या हाताने काम करणे बंद केले
बालकाचे वडील सुधीर यांनी सांगितले, की विकासला ताप आल्यानंतर ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यानंतर त्याच्या डाव्या हाताची चेतना संपल्यासारखे त्यांना वाटू लागले. त्याच्या डाव्या हाताने काम करणे बंद केले. त्यांचे म्हणणे आहे, की त्याला पोलिओची लस देण्यात आली होती.
डॉक्टर म्हणाले, बालकामध्ये पोलिओसारखी लक्षणे दिसत आहेत, मात्र त्याला पोलिओच झाला आहे, का याची तपासणी केली जात आहे. स्टूल्सचा अहवाल आल्यानंतर याबद्दल अधिक बोलता येईल.
(पुढील स्लाइडमध्ये पाहा, आजारी बालकचे छायाचित्र)