आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, 53 जागांसाठी 680 उमेदवार रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसीमध्ये एका कुटुंबाने मतदानानंतर सेल्फी घेतला. - Divya Marathi
झांसीमध्ये एका कुटुंबाने मतदानानंतर सेल्फी घेतला.
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 12 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी 53 जागांसाठी मतदान सुरु आहे. 680 उमेदवार रिंगणात असून यात फक्त 9 टक्के महिला उमेदवार आहेत. 
 
UPDATE
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान आहे. माझे आवाहन आहे की सर्व मतदारांनी आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करावा आणि लोकशाहीचा उत्सव यशस्वी करावा.'
 
189 कोट्यधीश उमेदवार 
- यूपीमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे तो भाग मागासलेला समजला जातो. येथील सरासरी दरडोई उत्पन्न 100 रुपये आहे. जे की रोजगार हमी योजनेवरील मजुरीपेक्षाही कमी आहे. 
- याच भागात 189 उमेदवार हे कोट्यधीश आहेत. यात सर्वाधिक बहुजन समाज पक्षाचे आहेत.
- बसपा - 53 पैकी 45 उमेदवार 
- भाजप - 48 पैकी 36 उमेदवार 
- सपा - 33 पैकी 26 उमेदवार 
- काँग्रेस 25 पैकी 17 उमेदवार
 
या जिल्ह्यात मतदान 
-  प्रतापगड, कौशांबी, अलाहाबाद, जालौन, झांसी, ललितपुर, महोबा, हमीरपुर, बांदा, चित्रकूट, फतेहपुर आणि रायबरेली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...