आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP: 5th टप्प्यात 51 जागांसाठी मतदान सुरु, अखिलेश सरकारमधील 9 मंत्र्यांचे भवितव्य ठरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. सोमवारी राज्यातील 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी मतदानाला सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली. अखिलेश यादव सरकारमधील गायत्री प्रचापती, पवन पांडे यांच्यासह 9 मंत्र्यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. या टप्प्यात 1 कोटी 84 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आंबेडकरनगर जिल्ह्यातील आलापूर विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे निधन झाल्याने येथे 8 मार्च रोजी मतदान होणार आहे. 
 
अपडेट्

11 वाजतापर्यंत कुठे किती मतदान 
- सुलतानपुर: 26% 
- बहराइच: 26.67% 
- फैजाबाद: 27.03% 
- गोंडा: 22% 
- बलरामपुर: 24.75% 
- आंबेडकरनगर: 25.9% 
- संतकबीरनगर: 
- बस्ती: 26.10 
- सिद्धार्थनगर: 24% 
- श्रावस्ती: 26.54% 
- अमेठी: 28%
- अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळातील अवधेश प्रसाद यांच्या गाडीवर उशीरा रात्री हल्ला झाला. 
- पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या 9 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
- गोंडा येथील गांधी विद्यालयातील बुथ क्रमांक 51 आणि 52 मधील इव्हीएम मशिन बंद पडले. अर्ध्यातासापासून मतदान थांबले.
- गायत्री प्रजापती यांनी अमेठीमध्ये मतदान केले. त्यानंतर माध्यमांसमोर आलेले प्रजापती म्हणाले, 'अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील. मी 50 हजारांच्या फरकाने विजयी होईल. आज जनतेच्या कोर्टात फैसला होईल.'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...