आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्री राहिलेल्‍या शीला दीक्षित UP मध्‍ये CM पदाच्‍या उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शीला दीक्षित या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसने गुरुवारी केली. त्यामुळे सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत १५ वर्षे सरकारचे नेतृत्व करण्याचा अनुभव आणि चांगले काम यामुळे त्यांची निवड करण्यात आली, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत शीला दीक्षित यांच्या नावाची घोषणा केली. आझाद म्हणाले की, शीला दीक्षित यांनी दिल्लीत सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा म्हणून निवडण्यात आले आहे. त्या चांगली कामगिरी करतील, असा विशअवास आहे. पक्षाने ज्येष्ठ नेते संजय सिंह यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर प्रमोद तिवारी यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
ही मोठी जबाबदारी : शीला दीक्षित
निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शीला दीक्षित म्हणाल्या की, पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आहे. प्रियंका गांधी या खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी माझ्यासोबत राज्यभर प्रचार करावा, अशी माझी इच्छा आहे. उत्तर प्रदेश हे माझ्यासाठी फार मोठे आव्हान आहे. काँग्रेस पक्ष आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरा जाईल आणि भाजप, समाजवादी पक्ष तसेच बसपचे आव्हान स्वीकारेल.
घोटाळाप्रकरणी एसीबीची नोटीस
दिल्लीतील ४०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शीला दीक्षित यांना गुरुवारीच नोटीस बजावली. या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत सहभागी व्हावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. ‘ही नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे,’ असा आरोप शीला दीक्षित यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...