आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात सत्ताधारी सपाची कार्यकारिणी बरखास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पार्टीने गुरुवारी राज्य कार्यकारिणीसह 15 शाखा बरखास्त केल्या आहेत. मात्र, या बदलानंतरही मुख्यमंत्री अखिलेश यादव पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवामुळे बिथरलेल्या समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाने 36 नेत्यांचा राज्यमंत्रिपदाचा दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर सपप्रमुख मुलायमसिंह यांच्या निर्देशानुसार राज्य कार्यकारिणी आणि शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत. सपला 2009च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात घट होऊन त्यांना केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निकालानंतर मुलायम आणि अखिलेश प्रत्येक उमेदवार व जिल्हा अध्यक्षांसोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत. असे सप प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.