आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीमध्ये 12 जिल्ह्यांत 69 जागांवर आज मतदान, तिसऱ्या टप्प्यात यादव कुटुंबातील 6 उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात यादव परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १२ जिल्ह्यांत निवडणुका होत असून फरुखाबाद, हरदोई, कन्नोज, मैनपुरी, इटावा, औरेया, कानपूर, कानपूर ग्रामीण, उन्नाव, लखनऊ, बाराबंकी आणि सीतापूर यांचा समावेश आहे.
 
२०१२ च्या निवडणुकीत ६९ पैकी ८० टक्के म्हणजे, ५५ जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. मैनपुरी, इटावा आणि कन्नोज यादव परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. इटावा  यादव परिवाराचे मूळ गाव आहे. कन्नोजमधून अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव खासदार आहेत, तर मैनपुरी येथून अखिलेशचे बंधू तेजप्रताप यादव खासदार आहेत. या तीन जिल्ह्यांत २०१२ मध्ये सर्व १२ जागांवर समाजवादी पक्ष निवडून आला आहे.  

मुलायमांच्या सूनबाई ते तेजप्रतापच्या आजोबांपर्यंत  
इटावा जसवंतनगर येथून शिवपाल यादव निवडणूक लढवत आहेत. अपर्णा यादव लखनऊच्या छावणीतून निवडणूक लढवत आहेत.  अखिलेश यांचे बंधू अनुराग यादव लखनऊतील सरोजिनीनगरातून निवडणूक लढवत आहेत.
 
मुलायमचे बंधू अभय राम यांचे चिरंजीव आहेत. मुलायमसिंगाचे पुतणे जोगिंदरसिंग एटा येथील विधानसभा जागेवरून आणि मुलायमचे व्याही रामवीर यादव फिरोजाबाद येथून निवडणूक लढवत आहेत. मुलायम यांचे आणखी एक व्याही रामप्रकाश यादव शिकोहाबाद येथून निवडणुक लढवत आहेत. 

आव्हाने
यादव परिवारात कलह  
मुलायम यांची ताकद कमी होणे आणि अखिलेशची पकड मजबूत होणे यावर  सपा कमकुवत होईल की आणखी मजबूत हे निकालानंतरच स्पष्ट होईल.  
 
मुलायम प्रचारापासून दूर 
मुलायमसिंग यादव समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक होते; परंतु या निवडणुकीत त्यांनी शिवपालसिंगसाठी दोन सभा आणि  अपर्णा या सुनेसाठी एक सभा घेतली.  
 
शिवपाल यांचे बंड  
शिवपाल यादव निवडणुकीनंतर दुसरा पक्ष स्थापन करू शकतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. अखिलेशवर ते नाराज आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...