आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईच्या राज्यशास्त्रात यूपीए, एनडीएची धोरणे!, २०१५-१६च्या क्रमिक पुस्तकात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर (राजस्थान) - सीबीएसईच्या इयत्ता १२ वी अभ्यासक्रमात आता एनडीए व यूपीए कार्यकाळाचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार इयत्ता ९वी ते १२वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला अाहे.

वेबसाइटनुसार १२ वी अभ्यासक्रमातील नवे प्रकरण काही विशिष्ट काळातील धोरणे आणि निर्णयांवर आधारित असेल. यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची माहिती देण्यात आली आहे.

सीबीएसई बारावीच्या राज्यशास्त्र विषयात "रिसेंट डेव्हलपमेंट इन इंडियन पॉलिटिक्स' हे प्रकरण जोडण्यात आले असून यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारचा कार्यकाळ (१९९६), एनडीए सरकारचा कार्यकाळ (१९९८ ते २००४) आणि त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळाचा समावेश आहे.