आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Upper Castes At Pampore Martyr Own Village Balk At Giving Public Land For His Funeral

पंपोरमधील शहिदाला मिळेना साडेतीन हात जागा, वाचा मेंदूला झिनझिन्या आणणारे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंपोर येथे झालेल्या चकमकीत वीरसिंह यांना वीरमरण आले. - Divya Marathi
पंपोर येथे झालेल्या चकमकीत वीरसिंह यांना वीरमरण आले.
फिरोजाबाद - मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेले सीआरपीएफ कॉन्स्टेबल वीरसिंह यांना मृत्यनंतर साडेतीन हात जागा मिळण्यासाठी त्यांचे वृद्ध वडील आणि मुलांना लढावे लागले. ही देशाची मान शरमेने खाली झुकवणारी घटना फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबादमधील नगला येथे घडली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना देशाचे आठ जवान कामी आले. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला देशभरातून नमन केले जात आहे. विविध ठिकाणांहून लोक त्यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी येत आहेत. मात्र नगलाच्या ग्रामस्थांनी वीरसिंह दलित समाजाचे असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास नकार दिला.

जातियतेच्या विषवल्लींमुळे नकार
ज्या गावात वीरसिंह लहानाचे मोठे झाले, सैन्यात भरती झाले त्याच गावात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास गावातील उच्चवर्णींयांनी नकार दिला. कारण फक्त एकच की वीरसिंह नाट समुदायातील होते. खालच्या जातीतील व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार कसा, असा सवाल रुढीवाद्यांनी उपस्थित करुन प्रशासनाला पेचात टाकले होते.
याची माहिती जिल्हाधिकारी चंद्रभान यांना कळाल्यानंतर ते गावात पोहोचले आणि त्यांच्या मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासोबतच स्मारकासाठी दहा बाय दहाची जागा देण्यास परवानगी दिली.
कंथारी गावचे सरपंच विजयसिंह यांनी सांगिल्यानुसार, काही लोकांनी शहीद जवानाच्या कुटुंबाने सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठीच्या जागेला विरोध केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखवली आहे.

कुटुंबातील एकमेक कमावती व्यक्ती
वीरसिंह हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. 1981 मध्ये सीआरपीएफमध्ये ते भरती झाले होते. आजही त्यांचे कुटुंब गावात पत्र्याच्या एका छोट्या घरात राहाते. येथे वरसिंह यांची पत्नी, एक मुलगी, दोन मुले आणि वडील राहातात. त्यांची मुले अजून शिकत आहेत, तर 22 वर्षांच्या मुलीचे अजून लग्न होणे बाकी आहे.

वीरसिंह यांचा 18 वर्षांचा मुलगा रमनदीप म्हणाला, माझ्या वडिलांनी या देशासाठी प्राणार्पण केले आणि लोक येथे त्यांना एक जमीनीचा तुकडा देण्यासाठी नकार देत आहेत.
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, जिल्हाधिकारी चंद्रभान यांनी म्हटले आहे, की आता प्रकरण निवळले आहे. संपूर्ण जिल्हा शहीद वीरसिंह यांना नमन करतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मागणारी त्यांची मुले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...