आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : नितीशकुमारांच्‍या सभेत लागले \'मोदी-मोदी\'चे नारे, दाखवली चप्‍पल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितीशकुमार यांना चप्‍पल दाखवताना विरोधक. - Divya Marathi
नितीशकुमार यांना चप्‍पल दाखवताना विरोधक.
निवडणूक डेस्‍क (बिहार) - राज्‍यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, आज (मंगळवारी) नवादाच्‍या वारसलीगंज येथे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांची प्रचार सभा झाली. मात्र, यामध्‍ये 20 ते 25 नागरिकांनी नितीश यांना चप्‍पल दाखवली आणि नंतर 'मोदी-मोदी'चे नारे लावले. त्‍यामुळे एकच गोंधळ उडाला. नितीशकुमार हे महाआघाडीचे (जेडीयू-काँग्रेस-आरजेडी) उमेदवार प्रदीप कुमार यांच्‍या प्रचारासाठी आले होते.
काय म्‍हणाले नितीश ?
अचानक आणि अनपेक्षित झालेल्‍या या प्रकारावर नितीशकुमार म्‍हणाले, ''मला माहिती आहे की तुम्‍ही कोण आहेत. तुमची संख्‍यासुद्धा खूप कमी आहे. तुम्‍ही येथून निघून जाणेच हे तुमच्‍या भल्‍याचे आहे'', असे म्‍हणत त्‍यांनी उपस्‍थ‍ित गर्दीला विचारले, ''तुम्‍हाला माझे भाषण ऐकायचे की ?'' त्‍यांनी असे विचारताच महाआघाडीच्‍या समर्थकांनी विरोध करणाऱ्यांना हाकलून दिले. नंतर नितीश यांनी भाषण केले.
यापूर्वीसुद्धा झाला होता विरोध
यापूर्वीसुद्धा अनेक ठिकाणी नितीश यांना विरोधाचा समाना करावा. 'आशा' संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या मागण्‍यांसाठी मोतिहारी जिलह्यात त्‍यांचा ताफा अडवला होता. काही दिवसांअगोदर एका कर्मचारी संघटनेनेही नोकरीत कायम करावे, या मागणीसाठी सभेत गोंधळ घातला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...