आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीपीसीएसचा पेपर व्हॉट्सअॅपवर लीक, विरोधकांची सीबीआय चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विभागीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीपीसीएस) प्राथमिक परीक्षेचा पेपर व्हॉट्सअॅपवरून फुटला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही वेळ आधीच हा प्रकार घडला. भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनी या घटनेची सीबीआय चौकशी करून उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अनिल यादव यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
याबाबत पोलिस महासंचालक ए. के. जैन यांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी ९.१५ वाजता व्हॉट्स अॅपवर पेपर फुटला. फुटलेल्या पेपरमधील प्रश्न पीसीएसच्या प्राथमिक परीक्षेच्या मूळ पेपरसारखाच होता. आम्ही या घटनेची माहिती मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना दिली आहे. विशेष कृती दल या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच आम्ही दोषींपर्यंत पोहोचू. राज्यातील ९१७ केंद्रांवर साडेचार लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दिवसभरात दोन टप्प्यांत ही परीक्षा झाली. वेळेवर परीक्षा पार पडली, असे लखनऊच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.