आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Law Shaking Syndrome Snatched Baby From Indian Couple

अमेरिकेच्या कायद्याने अडीच महिन्यांच्या बाळाला केले आई-वडिलांपासून वेगळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळ आराध्यसह आशिष आणि विदिशा (फाइल फोटो) - Divya Marathi
बाळ आराध्यसह आशिष आणि विदिशा (फाइल फोटो)
जयपूर (राजस्थान) - अमेरिकेच्या कडक कायद्यामुळे एका भारतीय दाम्पत्याला त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळापासून दूर केले आहे. न्यू जर्सी मध्ये राहाणाऱ्या दाम्पत्याकडून बाळ पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता, या चुकीची शिक्षा सध्या आई-वडील भोगत आहेत.

कोणाच्या कस्टडीत आहे बाळ
जयपूरच्या सिरसी रोड येथील रहिवासी आशिष पारिक न्यू जर्सीमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. 10 ऑगस्ट 2015 रोजी पत्नी विदिशाला घेऊन ते न्यू जर्सीला स्थायिक झाले. गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी विदिशा आणि आशिष एका मुलाचे आई-वडील झाले. त्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाचे नाव आराध्य ठेवण्यात आले. एके दिवशी विदिशाच्या मांडीवरुन बाळ पडले आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, त्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले.

सात दिवस आराध्य आयसीयूमध्ये होता. दरम्यान विदिशा-आशिष यांच्यावर बाळाला पाडण्याचा आणि त्याला इजा पोहोचवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आता बाळ आराध्य सुखरुप आहे, मात्र अमेरिका सरकारने दाम्पत्याची चूक मोठी असल्याचे सांगत बाळाचा ताबा त्यांना देण्यास नकार दिला आणि त्याला आपल्या कस्टडीत ठेवले आहे.

काय आहे शेकेन सिंड्रॉम
- शेकेन बेबी सिंड्रॉम बहुतेकवेळा एक वर्षापर्यंतच्या बाळांना होतो.
- डोक्याला मार लागल्याने मुले हिंसक होतात.
- दोन ते चार महिन्यांच्या काळात या आजाराचा परिणाम अधिक असण्याची शक्यता असते.
- दोन वर्षानंतर या आजाराचा परिणाम कमी असतो.

बाळाला आई-वडिलांपासून वेगळे करण्याचा आदेश
- कोर्ट कारवाईने आराध्यला सध्या आई-वडिलांपासून वेगळे ठेवण्याचे आदेश दिले आहे.
- वडील आशिष यांच्यावर मुलाला भेटण्याची बंदी घालण्यात आली आहे.
- आई विदिशाला पोलिसांसमक्ष थोडावेळ बाळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- या कोर्ट कारवाईमुळे अडीच महिन्यांच्या बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागत आहे.

परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांची मागितली मदत
- आशिष यांनी अमेरिकेत कोर्टाचे दार ठोठावले आहे. 4 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत त्यांनी स्वतःची बाजू मांडली. आता पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यांनी भारतीय दुतावास, दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना 8 जानेवारी रोजी ई-मेल पाठवून मदत मागितली आहे. भारतीय दुतावासाने फोन करुन त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज