जम्मू - कटरामध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली. सहा लोकांना घेऊन वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणारे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात महिला पायलट व दोन कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांत जम्मू व दिल्लीच्या प्रत्येकी ३ जणांचा समावेश आहे. त्यापैकी अर्जुन व वंदना यांचा विवाह १८ नोव्हेंबर रोजी झाला होता. अर्जुन हवाई दलात होते. प्राथमिक चौकशीनुसार एका गिधाडाने हेलिकॉप्टरच्या पंखांला धडक दिली. त्यामुळे पंखाने काम करणे बंद केले आणि वेगाने हेलिकॉप्टर खाली येऊ लागले.त्याच दरम्यान ते विजेच्या तारांना अडखळले. त्यामुळे आग लागली. मदत पथक पोहोचेपर्यंत सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले होते. ५ वर्षांपासून वैष्णोदेवीत चॉपर सेवा आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अपघात आहे.
- पुढील आदेशापर्यंत हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्याचा प्रशासनाने घेतला निर्णय.
-दोन कंपन्यांच्या ४ हेलिकॉप्टरची रोज १०० वर उड्डाणे, १००० जणांची होते ने-आण.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जीव गमावला; पण पायलट सुमिताने भरवस्तीत पडू दिले नाही हेलिकॉप्टर...बघा दुर्घटनेचे आणखी फोटो....