आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ट ‘चॅम्पियन शेव’नावाने रेजरच्या दुनियेत; ६७ कोटींची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन - वेगात अनेक विक्रम आपल्या नावे करणारा युसेन बोल्ट अाता रेजरच्या दुनियेत उतरला आहे. त्याने “चॅम्पियन शेव’नावाच्या व्यवसायात ६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याने पुरुषांतील ग्रुमिंग ट्रेंडला बघून नवे सहा ब्लेड असलेले रेजर बाजारात आणले आहे. यासाठी बोल्ट खूप उत्साहित आहे. बाजारात हे रेजर उपलब्ध व्हावे म्हणून बोल्ट रिटेलरच्या संपर्कात आहे. याआधी त्याने प्युमासोबत आपली क्लोदिंग लाइन लॉँच केली होती. एका समूहासोबत त्याने “युसेन बोल्ट ट्रॅक अँड रेकॉर्ड््स (यूबीटीआर)’ नावाचे कॅज्युअल आऊटफिटही लाँच केले आहे.
२०१७ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर निवृत्ती घेण्याचे संकेत बोल्टने आधीच दिले होते. यामुळे त्याने आतापासूनच आपल्या व्यवसायावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. बोल्ट म्हणाला, “पुरुषांत चॅम्पियनसारख्या भावना निर्माण करणे, हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आमच्या ब्लेडने शेविंग करून त्यांचे लूक ग्रुम होईल. ही बेल्ड त्यांना चॅम्पियनसारखे लूक देईल.’ एकदा बाजारात आल्यानंतर दरवर्षी १५ ते २० टक्के वाढ करण्याचे आमचे लक्ष असेल. मी जितकी गंुतवणूक केली आहे, त्याचा उपयोग उत्पादनाचे लाँचिंग, मार्केटिंग आणि प्रोडक्शनमध्ये होईल. आम्ही सर्वात आधी आमचे रेजर नॉर्थ अमेरिका, युरोप आणि कॅरेबियन देशात लाँच करणार आहोत. आम्ही आमची ब्लेड ऑनलाइनसुद्धा विकणार आहोत, असे बोल्ट म्हणाला.

एनएफएलमध्ये खेळण्याचा प्रस्ताव धुडकावला
बोल्टने अमेरिकेच्या प्रसिद्ध लीग नॅशनल फुटबॉल लीगमध्ये खेळण्याचा प्रस्ताव धुडकावला आहे. बोल्ट म्हणाला, “मला फुटबॉल खूप आवडतो. मी बालपणी फुटबॉल खूप बघत होतो. कधी कधी खेळायचो सुद्धा. मात्र, एनएफएलमध्ये खेळण्याचा कधीही विचार केला नाही.’ बोल्टच्या आधी त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू गॅटलिनलासुद्धा एनएफएलमध्ये खेळण्याची ऑॅफर मिळाली होती. त्या वेळी गॅटलिन २००७ मध्ये डोपिंगमुळे बंदीचा सामना करत होता.
बातम्या आणखी आहेत...