आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Usain Bolt To Play Cricket Match Vs Yuvraj Singh News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युसेन बोल्टने मारले ५ षटकार; टीम युवीवर केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - जगातला सर्वाधिक वेगवान धावपटू युसेन बोल्टने युवराजसिंगविरुद्ध क्रिकेट खेळून प्रेक्षकांची मने तर जिंकलीच, शिवाय सामनाही जिंकला. बोल्टने चिन्नास्वामी स्टेडियमवर ६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत आपल्या क्रिकेट प्रतिभेचे प्रदर्शन केले. स्टेडियमवर बोल्टला पाहण्यासाठी चाहत्यांनी खचाखच गर्दी केली होती. बोल्टच्या संघाने या क्रिकेट सामन्यात सात खेळाडूंच्या युवराजच्या टीमला पराभूत केले.

टीम बोल्टने अखेरच्या चेंडूवर युवराजवर विजय मिळवला. हा सामना प्रत्येकी ४ षटकांचा होता. सहा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बोल्टने १९ चेंडूंत ४५ धावा काढल्या. यात त्याने ५ षटकार ठोकले. यातील ३ षटकार युवीच्या गोलंदाजीवर मारले. त्याच्या संघाने ५९ धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठून रोमांचक विजय मिळवला.
तत्पूर्वी, टीम युवराजने प्रथम फलंदाजी करताना ४ षटकांत ५८ धावा काढल्या. युवराज आणि तारे यांनी अनुक्रमे ११ चेंडूंत २४ आणि ११ चेंडूंत ३० धावा काढल्या. युवीने ४ चौकार आणि १ षटकार, तर तारेने ४ चौकार आणि १ षटकार मारला.

या सामन्याला "बोल्ट अँड युवी बॅटल ऑफ द लिजेंड्स' असे नाव देण्यात आले होते. यादरम्यान बोल्ट आणि युवीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही सहभाग घेतला. फिनिश लाइनजवळ थांबून बोल्टने युवीला ही शर्यत जिंकू दिली.

माझे वक्रिम मोडणे कठीण..
तुमच्या विक्रमांना कुणाकडून आव्हान मिळू शकते, या प्रश्नावर स्मित करीत माझे वक्रिम हे मोडणेच काय, तिथपर्यंत पोहोचणेदेखील कुणाच्याही आवाक्यापलीकडचे असल्याचे विश्वविक्रमी जमैकन धावपटू युसेन बोल्ट याने सांगितले. प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या बोल्टने पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. बोल्टच्या नावे १०० आणि २०० मीटरमधील जागतिक विश्वविक्रम असून हे दोन्ही विक्रम नावावर असलेला तो एकमेव धावपटू आहे.