आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षाच्या मुलाच्या पोटात सापडले गर्भाशय, डॉक्टरांनी पहिल्यादाच पाहिले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टरांच्या या टीमने दुर्बीणीच्या सहाय्याने मुलाचे ऑपरेशन केले. - Divya Marathi
डॉक्टरांच्या या टीमने दुर्बीणीच्या सहाय्याने मुलाचे ऑपरेशन केले.
उदयपूर- राजस्थानमध्ये 22 वर्षाच्या एका मुलाच्या पोटात चक्क गर्भाशय आढळले. गर्भाशय हे केवळ महिलांच्याच पोटात असते. या मुलाच्या पोटात मात्र जन्मापासूनच गर्भाशय होते. जीबीएच अमेरिकेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे तो तपासणीसाठी गेला होता त्यावेळी या मुलाचे अंडकोशही बाहेर नसल्याचे व ते पोटात असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मुलाला गायनॉकॉलॉजिस्टकडे पाठविण्यात आले. एमआरआय दरम्यान मुलाच्या पोटात गर्भाशय पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. 
 
दुर्बीणीच्या सहाय्याने करण्यात आले ऑपरेशन 

- बुधवारी यूरोलॉजी आणि गायनॉकॉलॉजिस्ट विभागाच्या डॉक्टरांनी दुर्बीणीच्या सहाय्याने हे ऑपरेशन केले. ऑपरेशन करुन डॉक्टरांनी हे गर्भाशय काढून टाकले आहे. ऑपरेशननंतर या मुलाची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असे प्रकार अत्यंत दुर्मिळ असतात. जगभरात आतापर्यंत अशी 400 प्रकरणे समोर आली आहेत.
- गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. शिल्पा गोयल आणि यूरोलॉजिस्ट डॉ. मनीष भट्ट यांनी हे ऑपरेशन केले.
- मुलाच्या घरच्यांनी त्याची लहानपणी तपासणी केली होती. तेव्हा त्यांना या बाबीची माहिती होती. आता मुलगा लग्नाच्या वयाचा झाल्याने त्यांची चिंता वाढू लागली होती. त्यांनी अखेर त्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...