आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttam Khobragade\'s Interview With Daily Bhaskar

देवयानी तर मोहरा,अमेरिकेचा इरादा भारताला धडा शिकवायचा होता - खोब्रागडेंचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यानच्या राजकीय वादाचे केंद्रबिंदू असलेल्या देवयानी खोब्रागडे आणि वडील उत्तम खोब्रागडे यांनी जयपूरच्या जयमहल पॅलेसमध्ये ‘दिव्य मराठी’शी विशेष बातचीत केली. या वेळी त्यांना अमेरिकेत त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविषयी विचारले असता त्या शांतच होत्या, परंतु वडील उत्तम खोब्रागडे याविषयी भरभरून बोलले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत देवयानीसोबत जे काही घडले त्यात देवयानी ही केवळ एक मोहरा होती. या प्रकरणाच्या माध्यमातून भारताला धडा शिकवणे हाच अमेरिकेचा उद्देश होता. भारतवंशीय अमेरिकन महाधिवक्ता प्रीत भरारा यांनी भारतीय न्यायपालिकेचा अवमान केल्याचा आरोपही खोब्रागडे यांनी केला.
अमेरिकेने देवयानी प्रकरणी भारताला मुद्दामहून लक्ष्य केले, असे वाटते काय?
अमेरिकन प्रशासन ‘ज्युडिशियल एक्स्टॉरशन’मध्ये लिप्त आहे. मुळात हे प्रकरण व्हिसा फसवणुकीशी संबंधित नाही. कारण देवयानीने व्हिसा फॉर्मवर स्वाक्षरी केली नव्हती. हे संपूर्ण प्रकरण संगीता रिचर्ड्स हिच्याशी संबंधित आहे. तिनेच व्हिसासाठी अर्ज केला होता आणि ते सत्यापितही करून घेतले होते. या प्रक रणाचा मोलकरणीचा मोबदला भरून दिल्यास सर्व आरोप परत घेतले जातील, असा प्रस्ताव अमेरिकन अधिका-यांनी आम्हाला दिला होता, परंतु तो आम्ही नाकारला.
अमेरिकेचे आरोप खरे आहेत का?
हे प्रकरण असत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही मोलकरणीला कमी मोबदला दिला हे जर सिद्ध झाले तर आम्ही तो तिला देण्यास तयार आहोत. तिने हे प्रकरण भारतीय न्यायालयात मांडावे. हा मुद्दा देशातील न्यायालयातच मांडावा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने पूर्वीच सांगितले आहे.
देवयानीला न्याय मिळेपर्यंत संसदेत जाणार नाही, असे परराष्‍ट्रमंत्री खुर्शीद म्हणाले होते. त्याचे काय?
याचे उत्तर सलमान खुर्शीदच देऊ शकतील, परंतु देवयानी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावी, असे मला वाटते. कारण हे प्रकरण फक्त देवयानीशीच नव्हे तर भारतीयता आणि भारताप्रती अमेरिकेच्या असलेल्या दृष्टिकोनाशी निगडित आहे. अमेरिका आपल्याप्रती अहंकारी आणि गर्विष्ठपणाने वागते.
सरकार हा मुद्दा निकाली काढण्यासाठी योग्य प्रयत्न करत आहे काय?
देवयानीवर अमेरिकेने लावलेले सर्व आरोप माघारी घेईस्तोवर आम्ही शांत राहणार नाही, असे आश्वासन मला परराष्‍ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. त्यामुळे मला सरकारकडून याविषयी चांगल्या अपेक्षा आहेत.
नेमके प्रकरण काय?
व्हिसा फसवणूक, मोलकरीण संगीता रिचर्डला कमी पगार देणे आणि या प्रकरणी चुकीची माहिती दिल्याचा आरोप अमेरिकेतील भारतीय वाणिज्यिक उच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांच्यावर झाला होता याप्रकरणी अमेरिकन पोलिसांनी अटक केली. एखाद्या गुंडाप्रमाणे त्यांची अंगझडती घेण्यात आली होती.