आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटनाच्या एसपीच्या सापळ्यात अडकला लाचखोर इनेस्पेक्टर, पैसे घेताना रंगेहाथ पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - पटना शहराचे एसपी शिवदीप लांडे यांनी युपी क्राईम ब्रांचच्या एका इनेस्पेक्टरला रविवारी लाच घेताना रंगेहात पकडले. मुरादाबाद पोलिस असलेल्या हा इनेस्पेक्टर लाच घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचला असा त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे एसपी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सामान्य वेशभूषा केली होती आणि तोंडावर ओढणईही घेतली होती. आरोपी इनेस्पेक्टरने जशी लाच घेतली, तसे शिवदीप लांडे यांनी त्याला धरले.

शिवदीप लांडे यांनी सांगितले की, युपी क्राईम ब्रँचचे इनेस्पेक्टर तीन वर्षांपासून पटनाच्या एका दुकानदारावर पैसे देण्यासाठी दबाव निर्माण करत होता. दुकानदारावर ओळखपत्राशिवाय एका गुन्हेगाराला सिमकार्ड विकण्याचा आरोप करत त्या आरोपातून मुक्त होण्यासाठी त्यास 10 हजार रुपयांची मागणी करत होता. या प्रकरणामुळे चिंताग्रस्त असलेल्या दुकानदाराने कोतवाली पोलिसांना माहिती दिल होती. त्यानंतर सापळा रचून त्या पोलिस इनेस्पेक्टरला पकडण्यात आले.


पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे इतर फोटो...