आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चालकाला डुलकी लागल्याने कालव्यात कोसळला वर्‍हाडाचा ट्रक;14 ठार, 28 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटा -  उत्तरप्रदेशातील एटा गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातात १४ जण ठार झाले, तर २८ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जलेसर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, गंभीर रुग्णांना आग्रा येथील एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. 

एका ट्रकमधून चाललेले हे लोक आग्रा येथून टिळ्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते. या दरम्यान, एटा येथील जलेसरजवळ हा ट्रक कालव्यात कोसळला. यातील १४ जण जागीच ठार झाले, तर २८ जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी जिल्हाधिकारी अमित किशोर आणि विशेष पोलिस अधीक्षक सत्यार्थ अनिरुद्ध यांनी पोलिस पथकासह धाव घेतली. अपघातानंतर लोकांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रास्ता रोको आंदोलन केले. अपघातानंतर पोलिसांचे पथक एक तास उशिराने पोहोचले, असा लोकांचा आरोप आहे. त्यांनी वेळीच मदत केली असती तर बळींच्या संख्येत इतकी वाढ झाली नसती, असे लोकांचे म्हणणे आहे. जखमींना आजूबाजूच्या लोकांनी मदत केली. 

साखरपुड्यावरून परतत होते वर्‍हाड...
- मिळालेली माहिती अशी की, वर्‍हाड आग्रा येथून साखरपुडा पार पाडून ट्रकने परतत होते. एटामधील जलेसर येथे ट्रक थेट कालव्यात कोसळला.
- या भीषण अपघातात ट्रकमधील 14 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. 
- ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

पोलिसांविरोधात घोषणाबाजी.... 
- घटनास्थळी जिल्हाधिकारी अमित किशोर आणि एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पोलिस फोर्ससह पोहोचले. 
- दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 
- पोलिस उशीरा पोहोचल्याने संतप्त जमावाने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रस्ता रोको आंदोलन केले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...