आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून तरुणीवर भाऊ-वडील-काकाकडून सामूहिक बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरनगर- वडील-मुलगी, भाऊ-बहीण आणि काका-पुतणीच्या नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आल्याने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर हादरले आहे. प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून जन्मदात बाप, सख्खा भाऊ आणि दोन काकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप 21 वर्षीय तरुणीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी  चारही आरोपींना अटक केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

- सूत्रांनुसार, पी‍डित तरुणी धानेदा येथील राहाणारी आहे.
- ती गावातील 32 वर्षीय तरुणासोबत दोन वेळा पळून गेली होती. नंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रकरण कोर्टात गेल्यावर तरुणीने प्रियकराच्या बाजूने साक्ष दिली.
- आपल्या मर्जीने तरुणासोबत गेल्याचे तिने कोर्टात सांगितले होते. आरोपीची निर्दोष सुटका झाली होती.

 

नर्सिंग होममध्ये केला सामुहिक अत्याचार...
- पीडित तरुणीने 2 नोव्हेंबरला अलाहाबाद कोर्टात धाव घेतली.
- एका नर्सिंग होममध्ये सख्खा भाऊ, वडील आणि दोन काकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला.
- इतकेच नाही तर गर्भात वाढणारे प्रियकराचे मूल देखील कुटुंबियांनी पाडण्यासाठी बळजबरी केल्याचा दावाही तिने केला.
- चारही आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि महिलेच्या परवानगीशिवाय गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...