आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttar Pradesh News In Marathi, Gas Cylinder Explosion, Divya Marathi

उत्तर प्रदेश: बसमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 10 ठार, 75 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ / बुलंद - उत्तर प्रदेशच्या खुर्जाहून जहांगिराबादकडे जाणा-या एका खासगी बसमध्ये सोमवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने १० जण ठार, तर ७५ जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये ८० प्रवासी होते. जखमींमध्ये ४० हून जास्त महिला आणि मुले आहेत. शिकारपूर- जहांगिराबाद मार्गावरून धावणा-या बसमध्ये अचानक स्फोट झाला. प्रवाशाने आणलेल्या एका लहान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.

ल्याचे सांगण्यात येते. स्फोटानंतर बसमधील प्रवाशांनी केलेल्या आरडाओरडीमुळे आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना बुलंद शहर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काही जखमींना दिल्लीच्या सफदरजंग व राममनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले.