वाराणसी - उत्तर प्रदेशात नराधम पोलिस कर्मचा-याने मित्राच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. काशी येथे शुक्रवारी हा प्रकार घडला असून याप्रकरणी विनोद राणा या पोलिस कर्मचा-यावर आरोप करण्यात आले आहेत. विनोद सध्या फरार आहे. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बलिया जिल्ह्यातील चितबडा स्टेशनमध्ये तैनात असून पीडित मुलीचे कुटुंब गाझीपूर येथील रहिवासी आहे. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी चंद्रा चौकाजवळील विनोद यांचे घर भाड्याने घेतले होते. शुक्रवारी विनोद
आपल्या मित्रासोबत काशी येथे आला आणि खोटा बहाणा करून मुलीला बोलावून तिच्याशी बोलू लागला. त्यानंतर तिला जबरदस्तीने आत घेऊन गेला आणि तेथे मित्रासोबत तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने पालकांसोबत पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. विनोद सध्या फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.