आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh: Three Killed In Clashes In Bijnor After Group Of Boys Harass Schoolgirl

बिजनौर जिल्ह्यातील गोळीबारात तिघांचा मृत्यू, १२ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - पश्चिम उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर दोन समुदायांत हिंसक संघर्ष झाला. छेडछाडीमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपींवर गोळीबार केला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर १२ पेक्षा जास्त जण जखमी झाले. पाच गंभीर जखमींना मेरठला हलवण्यात आले आहे. या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.नजिबाबाद मार्ग स्थित पेदा गावात शुक्रवारी सकाळी एका समुदायाच्या लोकांनी दुसऱ्या समुदायाच्या विद्यार्थिनीची छेड काढली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या लोकांच्या भांडणाला हिंसक वळण लागले.
बातम्या आणखी आहेत...