आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand: 6 Dead In Landslide, Heavy Rain Alert

उत्तराखंड : भूस्खलनामुळे 6 जणांचा मृत्यू, जोरदार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : भाविकांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
डेहरादून - गेल्या 10 दिवसांपासून सलग पाऊस पडत असलेल्या उत्तराखंडमध्ये आगामी 48 तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी भूस्खलनामुळे परिसरात सहा जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या धोक्यामुळे पुन्हा एकदा दोन दिवसांसाठी केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. हवामान विभागाने नैनिताल, चमोली, चंपावत, उत्तर काशी आणि डेहरादूनसाठी अलर्ट घोषित केला आहे. तर सोनप्रयाग, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिलह्यांसह परिसरात आधीच अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
पिथोरागडमध्ये भूस्खलन
8 जण उत्तराखंडच्या कुटीमध्ये 3 ऑगस्टला होणा-या गुलच पूजेमध्ये (शिव पूजा) सहभागी होण्यासाठी धारचूला येथे जात होते. पांगलाहून काही अंतरावर ब्यालधारजवळ भूस्खलन झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा (दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले) समावेश होता. घटनेबाबत माहिती मिळताच सीमा सुरक्षा दल आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचावपथकाने पाच मृतदेह ढिगा-यातून बाहेर काढले. तर इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमी असणा-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा या मार्गावरील काही फोटो...