आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uttarakhand Aid Work Once Again Starts, 55 Illness Jawan Back

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये मदतकार्य पुन्हा सुरू , 55 आजारी जवान माघारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहराडून - उत्तराखंडमध्ये दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी हवामान अनुकूल झाले. त्यामुळे मदतकार्याला नव्याने सुरुवात झाली. दोन दिवस या भागात सातत्याने पाऊस सुरू असल्याने बंद हेलिकॉप्टर मंगळवरी पुन्हा लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात व्यग्र झाली.


नैसर्गिक संकटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता एक हजारावर पोहोचली आहे. साडे पाच हजार नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. या दरम्यान वेगवेगळ्या भागांतील बचाव कार्याच्या 75 पैैकी 55 सदस्य आजारी पडल्यामुळे माघारी परतले आहेत. त्यांना पोटात काही तरी त्रास जाणवत होता.


उत्तराखंडचे डीजीपी सत्यव्रत बन्सल यांच्या मते, नवीन टीम रुद्रप्रयागसाठी रवाना झाली आहे. बद्रीनाथ, पुलना, गोविंद घाट आणि घोरापर्वमध्ये हेलिकॉप्टरच्या साह्याने साहित्य पाठवण्यात येत आहे. तुला, चमोलीमध्ये जोशीमठ व ग्वालदमहून हेलिकॉप्टरने साहित्य पुरवठा केला जात आहे. केदारनाथसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्याची तयारी झाली आहे. लष्कराकडून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती लष्करी अधिका-यांनी दिल्लीत दिली.