आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिहरी - उत्तराखंडमधील देवप्रयागजवळील टिहरी जिल्ह्यात काल पहाटे बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला, तर 27 जण जखमी झाले आहेत. दिल्लीहून गुप्तकाशीकडे जाणार्‍या उत्तराखंड परिवहन मंडळाच्या या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. गुप्तकाशीकडे जाताना व्यासी आणि देवप्रयाग दरम्यानच्या साक्नीधर या ठिकाणी 200 मीटर खोल, अरुंद दरीत बस कोसळली. या भीषण अपघातात 13 जण जागीच ठार झाले. मृत झालेल्यांमध्ये पुरुष प्रवाशांचा समावेश होता. सर्व मृतदेह जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ताब्यात घेतले तसेच जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी रवाना केले.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांपैकी 8 जणांवर देवप्रयाग येथे उपचार सुरू आहेत, तर उर्वरित 19 जणांना ऋषिकेश येथे उपचारासाठी आणण्यात आले. यापैकी चिंताजनक प्रकृती असलेल्या 8 जणांना डेहराडूनमधील जॉलिग्रँट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचालकाचा रस्त्याबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळेच हा अपघात झाला असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज बांधला जात आहे.