आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड : पाऊस, भूस्खलनासह, भूकंपाचे धक्के, 10 हजार लोकांना धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरकाशीच्या मोरीमध्ये अडकलेले लोक अशाप्रकारे बाहेर पडत आहेत. पावसामुळे येथील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. - Divya Marathi
उत्तरकाशीच्या मोरीमध्ये अडकलेले लोक अशाप्रकारे बाहेर पडत आहेत. पावसामुळे येथील अनेक रस्ते वाहून गेले आहेत.
देहराडून/नवी दिल्ली - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने उत्तराखंडमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. पाऊस आणि ठिकठिकाणी होत असलेल्या भूलस्खलनामुळे अनेकांजी जीव धोक्यात अडकला आहे. त्यातच रविवारी सकाळी भूकंपाचे धक्केही जाणवले. उत्तराखंडच्या चमोलीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पाच वाजून 18 मिनिटांनी नागरिकांना चमोली आणि आसपासच्या परिसरात धक्के जाणवले. उत्तराखंडच्या वरुणावत पर्वताच्या डोगराला भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे सुमारे 10 हजार लोकांना धोका निर्माण झाला आहे.

भूस्खलनांचे प्रमाण वाढले
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये वरुणावत डोगरावर ठरावीक अंतराने भूस्खलन होत आहे. त्यामुळे याच्या कालच्या भागात राहणाऱ्या सुमारे 10 हजार लोकांसाठी धोका निर्माण झाला आहे. 15 जुलैला सर्वात आधी डोंगरावर भेडा आढळल्या होत्या. वरुणावत डोंगरावर भूस्खलन होऊ नये म्हणून 2003 मध्ये 1700 मीटर उंचीवर ट्रिटमेंट करण्यात आली. त्यामुळे पायऱ्यांवर भेगा तयार झाल्या आहेत. उत्तरकाशी प्रशासनाने वरुणावत पर्वतापासून गंगोत्रीला जाणारा रस्ता बंद केला आहे.

तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रविवारपासून तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणच्या डोंगराळ भागामध्ये यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून तीन दिवस श्रीहेमकुंड साहीब, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. या इशा-यानंतर उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्हा प्रशाससाने सावधानी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
बातम्या आणखी आहेत...