आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मृतदेहांना लागली कीड, डीएनए नमुने घेणेही झाले आव्‍हानात्मक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/नवी दिल्‍ली- बचावकार्यात गुंतलेल्‍या लष्‍काराच्‍या जवानांना आता आणखी एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेलेल्‍या आणि इमारतींच्‍या ढिगा-यांखाली सापडलेल्‍या मृतदेहांना कीड लागली असून त्‍यांचे डीएनए नमुने घेणेही कठीण जात आहे. त्‍यातल्‍या त्‍यात बचावकार्याचा काही सकारात्‍मक परिणामही दिसून येत आहे. मात्र, प्रशासकीय समन्‍वयाअभावी ज्‍या लोकांना मदत घोषित करण्‍यात आली आहे. त्‍यांना त्‍याचा लाभ अजूनही मिळत नसल्याचे दिसून येते. उत्तराखंड सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांना वाचवल्‍याचा दावा केला आहे. पण अद्याप किती लोक बेपत्ता आहेत याची माहिती सरकारला नाही. बेपत्ता लोकांची संख्‍या माहित करून घेण्‍यासाठी वेगवेगळया राज्‍य सरकारांशी संपर्क साधण्‍यात येत आहे. मुख्‍यमंत्र्यांनी सर्व राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांना पत्र लिहून बेपत्ता लोकांची मा‍हिती देण्‍याची सूचना केली आहे.

मृतदेहांना लागली कीड

प्रशासन आणि लष्‍कराकडून होत असलेल्‍या बचाव कार्यात मोठया संख्‍येने मृतदेह सापडत आहेत. सडलेल्‍या मृतदेहांची संख्‍या मोठया प्रमाणात असल्‍यामुळे प्रशासनाला त्‍यांची ओळख पटेनशी झाली आहे. अनेक मृतदेहांना कीड लागलेली आहे. साथीच्‍या रोगाच्‍या शंकेने सरकार हैराण झाले आहे. डॉक्‍टरांची कमतरताही मोठया प्रमाणात भासत आहे.

दुर्गम भागात अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या नागरिकांपर्यंत अद्याप अन्‍न-पाणी पोहोचलेले नाही. येत्‍या दोन-तीन दिवसांत प्रत्‍येकापर्यंत आवश्यक मदत पोहोचेल असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

केदारनाथमध्‍ये लष्‍कराचे जवानही पडले आजारी, साथीच्‍या रोगाचा धोका

नैसर्गिक प्रलयाच्‍या 11 दिवसानंतर बुधवारी केदारनाथ येथे पहिले सामूहिक अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. सुरक्षा दलाच्‍या जवानांनी शवविच्‍छेदन आणि डीएनए नमुने घेतल्‍यानंतर काही मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. पूरग्रस्‍त भागात साथीच्‍या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. लष्‍कराच्‍या आरोग्‍य शिबिरात येणा-या लोकांना ताप, उलटी आणि जुलाबाचा त्रास होत आहे. केदारनाथ येथे बचावकार्यात गुंतलेले काही जवानही आजारी पडले आहेत. केंद्र सरकारने 11 डॉक्‍टरांची टीम उत्तराखंड येथे रवाना केली आहे. हरियाणा, दिल्‍ली, राजस्‍थान आणि महाराष्‍ट्र सरकारनेही डॉक्‍टरांची टीम पाठवली आहे.