आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Flood Fake Website And Pages On Facebook For Help

उत्तराखंड: महाप्रलयात वाहून गेले चिमुरडे; \'ऑनलाइन\' मदतीच्या नावाखाली गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/ नवी दिल्ली- केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयात सुमारे 1227 चिमुरडे वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1227 चिमुरडे वाहून गेल्याची माहिती सरकारतर्फे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला देण्यात आली. दुसरीकडे उत्तराखंडातील पूरग्रस्तांना 'ऑनलाईन' मदतीच्या नावाखाली देशातील दानशूर लोकांना गंडा घातला जात आहे.

भारतीय हवाई दलाच्या नावाने उत्तराखंडला मदत करण्यासाठी अनेक खोट्या वेबसाईट सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या 'फेसबुक'वर स्पेशल पेजेसही सुरू करण्यात आल्याची तक्रार खुद्द भारतीय हवाई दलाने दिल्ली पोलिसांकडे केली आहे.

हवाई दलाचा लोगोही वापरला....
उत्तराखंडमधील पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट सुरु करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या साईट्‍सवर हवाई दलाचा लोगो वापण्यात आला आहे. या साईटवर दोन बॅक खाते क्रमांकही देण्यात आले आहेत. या खाते क्रमांकावर रुपये पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी विंग कमांडर तेजवीर सिंह यांनी दोन अकाऊंट नंबर पोलिसांना दिले आहेत. हे दोन्ही अकाऊंट नंबर आदित्य नामक व्यक्तीचे असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्‍ट झाले आहे. वेबसाईटवर दिलेला खाते क्रमांक कोणत्या बँकेचे आहेत, त्यासाठी कोणती कागदपत्रे देण्यात आली आहेत, याची माहिती घेतली जात आहे.

'फेसबुक'वरही खोटी पेजेस...
सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या 'फेसबुक'वरही अशा प्रकारची अनेक खोटी पेजेस सुरू येऊन गंडा घातला जात आहे. 'फेसबुक'ची उत्तराखंडमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करणार आहे. तुम्हालाही पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असल्यास खालीलपैकी कोणत्याही एका खात्यावर मदत पाठवावी' असे पोस्ट अपलोड करून मदत पाठवण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

भारतीय हवाई दलाचा लोगो वापरुन देशातील लोकांची फसवणूक केली जात आहे. या प्रकारामुळे हवाई दलाची प्रतिमा मलिन होईल अशी भीतीही भारतीय हवाई दलाने (आयएएफ) व्यक्त केली आहे.

दि‍ल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाइन मदतीच्या नावा खाली गंडा घालणार्‍यांचे मोठे रॅकेस असण्याचा संशयही पोलिसांना आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, उत्तराखंडमधील विध्वंस आणि बचावकार्याचे छायाचित्रे....