आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Flood Problems: Search Mission For Missing In Flood

उत्तराखंड पूर संकट: बेपत्ता आप्तजनांसाठी दारोदार शोधमोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - 17 जून रोजी उत्तराखंडमध्ये ओढवलेल्या नैसर्गिक संकटात शेकडो प्राण गेले. शासनाने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला, मात्र त्यात अनेकांचा ठावठिकाणा लागला नाही.


सरकार महिनाभरानंतर बेपत्ता लोकांना मृत जाहीर करणार असले तरी नातेवाइकांनी अद्याप धीर सोडला नाही. आई, वडील, भाऊ, बहीण, मुलाच्या शोधासाठी अनेक नातेवाईक दारोदारी चौकशी करत असल्याचे दृश्य सध्या केदारनाथ घाटी क्षेत्रात पाहायला मिळत आहे. केदारनाथ घाटीतील फाता बाजार भागात अनेक जण बेपत्ता नातेवाइकांची छायाचित्रे घेऊन विचारणा करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अनंत कुलकर्णी यांच्या ग्रुपमधील 35 सदस्य बेपत्ता आहेत. पुण्याचे रहिवासी हेमंत कुलकर्णी यांचे 24 सहकारी बेपत्ता आहेत. त्यांच्याकडून आपल्या सहका-यांची विचारणा होत आहे. नेपाळमधील आलोक व अशिष पांडे गेल्या शुक्रवारपासून रुद्रप्रयागमध्ये नातेवाईक सापडतील या आशेवर आहेत. त्यांचे आई-वडील दुर्घटनेदिवशी रुद्रप्रयाग येथे होते. पाऊस, पुराच्या संकटामध्ये आई-वडिलांचा एकमेकांचा हात सुटला व अखेर वडिलांना एकटे घरी परतावे लागले.