आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवभूमीत पावसाचा कहर; मसुरीत इमारत कोसळून 7 ठार, उत्तराखंडमध्ये 30 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ देहरादून - उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. शनिवारी सकाळी मसुरीमध्ये जोरदार पावसामुळे एक इमारत दुसर्‍या इमारतीवर कोसळली यात सात जणांचा मृत्यू झाला. हे सातही जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे इमारती कोसळून आता पर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
पौडी येथे सर्वाधिक मृत्यू
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे यमकेश्वर, पौडी आणि पौडी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्वाधिक 14 मृत्यू झाले आहेत. टीहरी येथे दोन, देहरादूनमध्ये दोन आणि पिथौरागड यथे एक जणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 27 इमारती पडल्या असल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व नद्यांनी पुराची पातळी ओलांडली आहे. हरिद्वारमध्ये गंगेने केव्हाच धोक्याची पातळी ओलांडली आहे. येथे गंगेच्या लाटांनी सिंचनासाठी तयार केलेले बांध तुटले आहेत. त्यामुळे गंगा नागरी वस्त्यांमधून वाहात असून इमारतींजवळून पाणी जात आहे. याशिवाय राज्यातील काही भागात ढगफुटी झाल्याच्या सुचना मिळाल्या आहेत. भुस्खलनामुळे रस्ते मार्गाने होणारा संपर्क तुटला आहे.
बचावासाठी एनडीआरएफ
एनडीआरएफच्या जवानांसह बचावासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिक पुढे आले आहेत. पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे सर्वांचे प्रयत्न आहेत.
पुढील 48 तास धोक्याचे
हवामान खात्याने पुढील 48 तास राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील नदी किनार्‍यावरील सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वायुसेनेलाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट झाली आहे. याची Exclusive छायाचित्र पुढील स्लाइडमध्ये..