आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत; दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंड - उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन अस्त व्यस्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गांसोबतच अनेक रस्त्यांवरील वाहतूक खोळंबली आहे.
उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मागील 24 तासात मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त पाऊस टनकपूरमध्ये 109 मिमी एवढा नोंदवला गेला आहे, तर चंपावत येथे 59 मिमी, बेरीनागमध्ये 38.2 मिमी, देहरादूनमध्ये 35.7 मिमी, धारचूलामध्ये 35 मिमी, डीडीहाटमध्ये 33 मिमी, गंगोलीहाटमध्ये 30 मिमी, हल्द्वानीमध्ये 27 मिमी, कोश्याकुटोलीमध्ये 25 मिमी आणि कपकोटमध्ये 25 मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे गंगा, यमुना, शारदा आणि काली या सर्व नद्या तसेच त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या काठावर राहणार्‍या लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच राज्यातील पूर नियंत्रण विभागाचे नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर बारीक लक्ष आहे.

थांबून-थांबून पडणार्‍या सततच्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे डोंगरावरून अनेक दरडी रस्त्यांवर कोसळत आहेत, त्यामुळे अनेक गावांमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणे कठीण होत आहे. ऋषिकेश-केदारनाथ राष्ट्रीय महामार्गावरील सिरोबगडमध्ये आणि ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सुखीटाप आणि यमुनोत्री जंगलचट्टीसुध्दा बंद झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच ठिकाणी सीमा रस्ते संघटनातर्फे रस्त्यावरील ढिगारे साफ करण्याचे काम सुरू आहे.
तर दुसरीकडे मागील सहा दिवसांपासून बंद पडलेली केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा अजूनही बंदच आहे. तर वारंवार सुरू आणि बंद होणार्‍या मार्गांवरून चालत चालत काही तिर्थयात्रेकरूंनी गंगोत्री आणि यमुनोत्री गाठली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, उद्या 138 यात्रेकरूनी गंगोत्री गंगोत्री धामचे, तर 131 तिर्थयात्रींनी यमुनोत्री धामचे दर्शन घेतले आहे.