आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utter Pradesh Government Planning To Built Ram Temple In Ayodhya

\'सोमनाथ\'च्‍या धर्तीवर उत्तर प्रदेश सरकार अयोध्‍येत राम मंदिर बांधणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- समाजवादी पार्टीने अयोध्‍येतील वादग्रस्‍त राम मंदिराच्‍या मुद्याला हात लावला आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराप्रमाणे अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिराचे निर्माण करण्याची चाचपणी सपाने केली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील एक वरीष्ठ अधिका-याने त्यासाठी फैजाबादच्या सर्व प्रशासकीय अधिका-यांची एक महत्‍त्वाची बैठकही आयोजित केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली असून उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांनी यासंदर्भात स्‍पष्‍टीकरणही दिले आहे. या बैठकीत अयोध्येतील राजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवरील मंदिराच्या निर्माणाबाबत आढावा घेण्‍यात येणार आहे. या बैठकीत राज्‍याचे पोलिस महासंचालक, फैजाबादचे जिल्‍हाधिकारी तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी इतर बड्या अधिका-यांना उपस्थित राहण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे. ही बैठक 14 ऑक्‍टोबरला होणार आहे.

सुत्रांच्‍या माहितीनुसार, संसदेत कायदा पारित झाल्‍यानंतर अयोध्‍येत राम मंदिराचे निर्माण शक्‍य आहे का, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. उत्तर प्रदेशचे सचिव सर्वेश चंद्र मिश्रा यांनी अधिका-यांना पत्र पाठवून बैठकीत हजर राहण्‍याचे आदेश‍ दिले आहेत. या पत्रात 'श्रीरामजन्‍मभूमी' हा शब्‍द वापरण्‍यात आला आहे. त्‍यामुळेच बैठकीला जास्‍त महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

या बैठकीमुळे उत्तर प्रदेश सरकार खरोखरच वादग्रस्त जागेवर मंदिराचे बांधकाम करणार आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अयोध्‍येत कारसेवकांवर गोळीबार करण्‍याचा डाग समाजवादी पार्टीवर आहे. त्‍यामुळे ही चाल खेळून सपा हा डाग धुण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. तसेच बांधकामाचा निर्णय घेऊन इतर राजकीय पक्षांच्‍या हातून हा मुद्दाच काढून घ्‍याचा डाव यामागे असू शकतो. यामुळे राजकीय पंडितांच्या भुवयाही उंचावल्या गेल्या आहेत.

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्‍या जीर्णोद्धाराप्रमाणेच अयोध्‍येत रामजन्‍मभूमीवर राम मंदिराचे निर्माण करण्‍याची सपा सरकारची योजना आहे. यासाठी शासकीय पातळीवर रचना करण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले आहे.