आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूमध्ये तमिळींच्या भरोसे इन्फोसिसचे बाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - आम आदमी पार्टीने बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून इन्फोसिसचे चीफ फायनान्स ऑफिसर राहिलेल्या वी. बालकृष्णा यांना उमेदवारी दिली आहे. ते पायीच निवडणूक प्रचार करीत आहेत. बालकृष्णा यांना तमिळी मतदारांकडूनही भरपूर अपेक्षा आहेत. कारण ते स्वत: देखील तमिळ आहेत. राजकारणाचा त्यांना कोणताही अनुभव नाही, परंतू त्यालाच ते आपली शक्ती मानतात.

पायी प्रचार करण्याचे कारण बाला असे सांगतात की, त्यामुळे लोकांच्या समस्या समजून घेण्यास मदतच होते. ते पुढे म्हणतात, लोक राजकारणाला आता विटले आहेत. संपूर्ण व्यवस्थाच बदलण्याच्याच मूडमध्ये आता लोक आहेत. त्यांना आम आदमी पार्टीवरच भरवसा आहे, जी विकास आणि चांगल्या प्रशासनाचा दावा करीत आलेली आहे.

मलेश्वरममध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केला आहे की, मोदी यांची लाट वगैरे निवडणुकीत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भाजपाचे उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत. त्या खासदारांनी काय केले हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळेच ते मोदी मोदी नावाचा जप करीत आहेत. खरेतर भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही भ्रष्ट आहेत आणि लोकांच्या समस्या काय आहेत, याची त्यांना कल्पनाही नाही.

लोक आम आदमी पार्टीला मत का देतील या प्रश्नाचे उत्तर मिळते ते असे की, कॉंग्रेसच्या विरोधात सध्या वातावरण आहे आणि भाजप खासदाराने काहीएक काम केलेले नाही. सगळेच मोठमोठी स्वप्नं लोकांना दाखवित आले आहेत. मोठी समस्या भ्रष्टाचार हीच आहे आणि आम आदमी पार्टीचा जन्मही या विरूद्धच झालेला आहे. परंतू नंदन नीलेकणी तर कॉंग्रेसकडून निवडणूक लढवित आहे, त्यांना तर कॉंग्रेसमध्ये काही गलिच्छ दिसलेच नाही का? नीलेकणींवर काहीच नाही बोलत, पण असे म्हणतात, कॉंग्रेसची निवड चुकीची आहे.

व्ही. बालाकृष्णा
संपत्ती : 190 कोटी रूपये
इन्फोसिसचे सहा वर्षांपर्यंत सीएफओपदी राहिले. 2011 ते 2013 पर्यंत इन्फोसिसच्या संचालक मंडळावर होते.शेवटचे वेतन अडीच कोटी रूपये होते. देशात फायनान्स प्रोफेशनमध्ये मोठे नाव