आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishno Devi Helicopter Crash: 6 Pilgrims, Pilot Killed In Katra Chopper Accident

पाच दिवसांपूर्वी लग्‍न झालेले जोडपे हेलिकॉप्‍टर अपघातात ठार, कुटुंबाचा अकांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जून सिंह आणि वंदना या नवदाम्‍पत्‍याचा 18 नाव्‍हेंबरलाच विवाह झाला होता.  अर्जुन सिंह हे वायुदलात नोकरीला होते. - Divya Marathi
अर्जून सिंह आणि वंदना या नवदाम्‍पत्‍याचा 18 नाव्‍हेंबरलाच विवाह झाला होता. अर्जुन सिंह हे वायुदलात नोकरीला होते.
जम्मू - वैष्‍णोदेवीच्‍या दर्शनासाठी जात असलेल्‍या भाविकांचे हेलिकॉप्‍टर कोसळून सोमवारी भीषण अपघात झाला. यात महिला पायलट व दोन कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतामध्‍ये जम्‍मूचे चार, दिल्‍लीचे दोन आणि केरळच्‍या महिला वैमानिकाचा समावेश असून, यापैकी अर्जून सिंह आणि वंदना या नवदाम्‍पत्‍याचा 18 नाव्‍हेंबरलाच विवाह झाला होता. अर्जुन सिंह हे वायुदलात नोकरी करत होते. वैष्‍णोदेवीच्‍या दर्शनानंतर आपले संसारीक आयुष्‍य सुरू करण्‍यासाठी सकाळीच ते जम्‍मूमध्‍ये पोहोचले होते. मात्र, काळाच्‍या भांड्यात वेगळेच रसायण शिजत होते. या दुर्घटनेत या नवदाम्‍पत्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले. त्‍यांचे आई-वडील आणि नातेवाईकांनी अकांत केला. यामध्‍ये त्‍यांचे नातेवाईक महेवर हेसुद्धा या अपघातात ठार झाले.
हेलिकॉप्टर कंपनीकडून 15-15 लाखांची आर्थिक मदत
मृतांमध्‍ये सुमिता विजयान (केरळ), 25 वर्षीय अर्जुन सिंह, त्‍यांची 22 वर्षीय पत्नी वंदना, आत्‍याचा मुलगा महेवर सिंहद (जम्मू) यांच्‍या शिवाय अरनजीत सिंह (त्रिकुटा नगर जम्मू), 32 वर्षीय सचिन आणि त्‍यांची सहा वर्षांची मुलगी अक्षिता (दिल्ली) यांचा समावेश आहे. या सर्वांच्‍या कुटुंबांना हेलिकॉप्‍टर कंपनीकडून प्रत्‍येकी 15 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे.