आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धकुवांरी मंदिराजवळ लँडस्लाइड, दरड कोसळल्याने 4 ठार 7 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरड कोसळल्यानंतर बहुतेक भाविकांच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. - Divya Marathi
दरड कोसळल्यानंतर बहुतेक भाविकांच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत.
कटरा (जम्मू) - वैष्णोदेवी मंदिराजवळ भूस्खलन झाले असून एक मोठा कठडा कोसळला. त्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की ही घटना अर्धकुंवारी मंदिराजवळ घडली.

एकाचा जागेवरच मृत्यू
- शनिवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असताना भूस्खलन झाले. एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
- दरड कोसळल्याने अनेक भाविकांच्या डोक्याला जबर मार लागला. ज्या ठिकाणी भू-स्खलन झाले तिथून वैष्णोदेवी मंदिर अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे.
- अलीगड येथील अभय यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कटरा येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
- आणखी दोन जण जखमी आहेत. 20 वर्षांचे सुरजीत बर्मन पश्चिम बंगालमधील आहेत तर, राजस्थानचे 30 वर्षांचे राजीव सिंह आणि एक 10 वर्षांचा मुलगा जखमी आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील फोटो..
बातम्या आणखी आहेत...