आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day Spl. Love Story Of Raipur Couple Affected From Polio News In Marathi

Love Story: पोलिओमुळे परिवाराने रिजेक्ट केलेल्या मानवेंद्रला जसविंदरने केले सिलेक्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- जसविंदर आणि मानवेंद्र या दाम्पत्याची 'लव्ह स्टोरी' समाजात आदर्श निर्माण करणारी आहे. 'पोलिओ' हा आजार पायांना लुळे करू शकतो मात्र प्रेमाला नाही. खर्‍या प्रेमात इतकी ताकद असते की, त्यापुढे शारीरिक अक्षमता दुबळी ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

फिजिकली फिट असलेल्या जसविंदरचे पहिल्या भेटीतच मानवेंद्रवर प्रेम जडले. त्यामुळे मानवेंद्रला झालेल्या 'पोलिओ' देखील दोघांत अडथळा निर्माण करू शकला नाही. अपंग जीवनसाथीसोबत आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी येतील, असे जसविंदरला अनेकांनी सांगितले. मात्र, तिने कोणाचेही ऐकले नाही. जसविंदर आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर घरच्या मंडळींनी जसविंदरला मानवेंद्र याचासोबत विवाह करण्यास परवानगी दिली.
जसविंदरच्या बहिनीच्या विवाहात तिला मानवेंद्र याचे स्थळ आले होते. गुरुद्वारात जसविंदर आणि मानवेंद्र यांची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेंकात हरवून गेले. मात्र, मानवेंद्रला 'पोलिओ'असल्यामुळे जसविंदरच्या आई-वडीलांनी त्याला रिजेक्ट केले होते. जसविंदरने मात्र मनोमनी मानवेंद्रला जीवनसाथीच्या रुपात स्विकारले होते.

घरच्यांनी मानवेंद्रला रिजेक्ट केल्यामुळे जसविंदरला चैन पडत नव्हती. त्याने बहिण आणि जीजाजींना राजी करून कसा तरी मानवेंद्रचा मोबाइल क्रमांक मिळवला. जसविंदर ही मानवेंद्रला फोन करायची त्याचा आवाज ऐकला की परत ठेवून द्यायची. तेव्हा जसविंदर जमशेदपूरात आणि मानवेंद्र रायपूरमध्ये राहात होता.

अनेक महिने हा 'सिलसिला' सुरुच होता. अखेर जसविंदच्याच्या बहिनीने ही बाब मानवेंद्रला सांगितली. जसविंदला फोन येतात मानवेंद्र म्हणाला 'आप सीमा (जसविंदरचे घरे नाव) ही बोल रही हो ना?' असा प्रश्न केला. दोघांनी बोलता-बोलता एकमेकांना 'दिल की बात' सांगितली. मानवेंद्र जसविंदरला भेटण्यासाठी जमशेदपूरला पोहोचला. घराच्या मंडळींची परवानगी न घेतात एका पार्कमध्ये जसविंदरच्या बोटात अंगठी घातली. दुसरीकडे जसविंदरच्या बहिनीने त‍िच्या आई-वडीलांकडून होकार मिळवला. आणि दोघांचा थाटात विवाह पार पडला.
जसविंदर आणि मानवेंद्रच्या विवाहाला आज 15 वर्षे झाली आहेत. दोघांच्या संसार रुपी प्रेमवेलीवर दोन गोंडस फुले (एक मुलगा आणि एक मुलगी) उमलली आहेत. मानवेंद्रसोबत विवाह करण्याचा निर्णय योग्य ठकरल्याचे जसविंदर हिने सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, LOVE BIRDS जसविंद आणि मानवेंद्रचे फोटो...