आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Week: Nine Lakh Spent For Buying Fancy Number For Wife

व्हॅलेंटाइन वीक: नऊ लाख रुपये खर्चून पत्नीसाठी घेतला फॅन्सी नंबर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - व्हॅलेंटाइन वीकचा पहिला दिवस रोज-डे. या दिवशी गुलाबाचे फूल भेट देण्याची प्रथा आहे. मात्र प्रेम करणा-यांसाठी कुठलीही भेट तशी कमीच असते. चंदिगडचे व्यावसायिक हरीश गोयल यांनी तब्बल पावणेनऊ लाख रुपये खर्च करून पत्नी कामिनी यांना सीएच-०१ बी बी-०००१ हा फॅन्सी क्रमांक भेट दिला आहे. ज्या पोर्श कारसाठी त्यांनी हा क्रमांक खरेदी केला आहे ती कार कामिनी यांनी हरीश यांना त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे.

हरीश रिअल इस्टेट, शेअर मार्केटचा व्यवसाय करतात. कामिनी त्यांचे बॅक ऑफिस सांभाळतात. हरीश म्हणाले, ‘माझ्या वाढदिवशी १८ जानेवारी रोजी कामिनीने पोर्श कारची चावी माझ्या हातात ठेवली. ते मॉडेल मला प्रचंड आवडले. पत्नीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिटर्न गिफ्टच्या रूपात विशेष क्रमांक देण्याचा निर्णय घेतला होता.’

हरीश यांनी आरटीओला यासाठी ८.७५ लाख रुपये दिले. ही विशेष क्रमांकाची कार घेऊन व्हॅलेंटाइन डेला पत्नीसोबत लाँग ड्राइव्हवर जाण्याची त्यांची योजना आहे.