आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varanasi Modi Parliamentary Office Inauguration Amit Shah

भाजप कार्यकर्ते, पत्रकारांच्या वादावादीत वाराणसीतील मोदींच्या कार्यालयाचे उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले.

वाराणसी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी उत्‍तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये वाद झाले. यावेळी सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शहा यांनी विधीवत कार्यालयाचे उद्घाटन केले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ (आरएसएस) चे शिव शरण पाठक यांना या कार्यालयाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाठक यांनी भाजपचा प्रचार केला होता.

मोदी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार केली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, स्थानिक भाजप नेतेही त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. ही माहिती भाजपच्या मुख्य नेत्यांपर्यंतही पोहोचवण्यात आली होती. याच तक्रारी सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

पुढे पाहा, शहा यांच्या वाराणसी दौ-याची काही छायाचित्रे...