आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोंमुळे मनीष ठरले जगातील दुसर्‍या क्रमांकाचे स्ट्रीट फोटोग्राफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसीमध्ये राहणारे मनीष खत्री वर्ल्ड स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये जगातील 72 देशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी फोटोंच्या माध्यमातून काशीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्ट्रीट हंटर्स डॉट कॉमने एक स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये पहिल्या क्रमांवकर पोर्तुगालचे स्ट्रीट फोटोग्राफर रुई पाल्हा तर दुसर्‍या क्रमांवर मनीष खत्री राहिले. मनीषने सांगितले की, या स्पर्धेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटोंसोबच कलर फोटोंचाही समावेश होता.

वाराणसीच्या महास्मशानपासून ते अस्सी घाटाचे फोटो या स्पर्धेमध्ये दाखवण्यात आले. मनीषनुसार स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये एखादे टार्गेट सेट करून क्लिक केले जात नाही तर जवळपासच्या जिवंत चित्राला क्लिक केले जाते. वाराणसीमधील घाट, मंदिर, अरुंद रस्ते, कला, संकृती आणि जीवनशैली या फोटोग्राफीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये फोटोग्राफरने दाखवले आहे की, कशाप्रकारे महास्मशान मणिकर्णिका काशीला जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देते.
72 देशांच्या फोटोग्राफर्सचा सहभाग -
मनीषने सांगितले की, वर्ल्ड स्ट्रीट फोटोग्राफी स्पर्धा खूप कठीण आहे. 72 देशांमधून निवडलेले खास फोटोग्राफर या स्पर्धेमध्ये भाग घेतात. यामधील 20 फोटोग्राफर्सची निवड करून संपूर्ण जगात ऑनलाइन मतदान घेतले जाते. या स्पर्धेमध्ये वाराणसीच्या फोटोंचे खूप कौतुक करण्यात आले. मनीष 403 मतांनी पोर्तुगालच्या रुई पाल्हापासून मागे राहिले.

पुढील स्लाईड्मध्ये पाहा, मनीष खत्री यांनी काढलेले खास PHOTOS
बातम्या आणखी आहेत...