आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Nations Navy Parad Starts In Andaman Sea

अंदमान सागरात विविध देशांच्या नौदल कवायती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट ब्लेअर - अंदमानच्या सागरात सध्या 17 देशांचे नौदल आहे. विविध देशांचे हे नौदल लष्करी कवायतीसाठी नव्हे, तर मेळाव्याच्या रूपात एकत्र आले आहेत. मेळाव्याचे यजमानपद भारताकडे आहे, त्यामुळे त्याचे नाव मिलन ठेवण्यात आले आहे.
मेजर राजेश सिंह ढिल्लो सिंगापूरहून आपले लढाऊ जहाज आरएसएस रिजिलियन्स घेऊन येथे आले आहेत. परदेशी लढाऊ जहाजाचे नेतृत्व करणारे राजेश एकमेव भारतीय आहेत. मेजर ढिल्लो पंजाबच्या तरणतारण शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी गावात येऊन नातेवाइकांसोबत सुटीचा आनंदही घेतला. जन्म सिंगापूरमधील, नागरिकत्वही तेथीलच, मात्र ढिल्लो स्वत:ला पक्के पंजाबी समजतात. त्यांना पंजाबी किंवा हिंदी बोलताना येत नाही ही वेगळी बाब. ढिल्लो 27 महिन्यांपासून जहाजाचे नेतृत्व करत आहेत. आठवडाभराच्या सेलिंगनंतर 70 जणांच्या चालक दल सदस्यांसह ते अंदमान निकोबारला पोहोचले आहेत.
केवळ ऑस्ट्रेलियन नेव्ही महिला नौसैनिकांसोबत आली :
ऑस्ट्रेलियाचे नौदल सर्वांत लांबच (2000 कि.मी.) प्रवास करून मिलनसाठी पोहोचले आहेत. येथे येणा-यांमध्ये महिलेची तैनाती असलेले हे एकमेव जहाज आहे. ऑस्ट्रिलियाचे जहाज एचडीएमएस चिल्डर्सची महिला अधिकारी जे फिलिप इलेक्ट्रिकल ऑफिसर आहे. त्या पहिल्यांदाच भारतात आल्या आहेत. त्यांच्या जहाजावर आणखी 12 महिला तैनात आहेत. त्यात 6 अधिकारी, 7 नाविक. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी.के. जोशी म्हणाले, देशांची संख्या वाढत आहे. या वेळी नऊ देशांनी लढाऊ जहाज आणले आहे.
काय आहे मिलन
मिलनची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. त्या वेळी पाच नौदल आले होते. अनेक देशांचे नौदल शिष्टमंडळ व लढाऊ जहाजांसोबत आले होते. यामध्ये परिसंवाद, चर्चा, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या वर्षीच्या परिसंवादाचा विषय आपत्कालीन मदत आणि मानवी साहाय्यता हा आहे.