आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युपीतील मानिकपूरमध्‍ये वास्‍को द गामा-पाटणा एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; तिघांचा मृत्‍यू, 13 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्‍तरप्रदेशातील माणिकपूर स्‍टेशनजवळ सकाळी 4.18 वाजेच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली. - Divya Marathi
उत्‍तरप्रदेशातील माणिकपूर स्‍टेशनजवळ सकाळी 4.18 वाजेच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली.

चित्रकूट- उत्‍तर प्रदेशमध्‍ये 'वास्‍को-द-गामा-पाटणा' एक्‍सप्रेस शुक्रवारी सकाळी रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्‍यू झाला असून 13 जखमी झाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनूसार या रेल्‍वेचे 13 डब्‍बे रुळावरुन घसरले. ट्रेन पाटणा जंक्‍शनवरुन गोवा येथील मडगाव स्‍टेशनला जात होती. रेल्‍वे ट्रॅक तुटल्‍यामुळे ही दुर्घटना झाल्‍याची माहिती आहे.

 

कुठे झाली दुर्घटना?
- उत्‍तर प्रदेशमधील चित्रकूट येथे मानिकपूर स्‍टेशनजवह सकाळी 4.18 वाजेच्‍या सुमारास ही दुर्घटना झाली. घटनास्‍थळी अलाहाबाद मेडिकल टीमला पाठवण्‍यात आले आहे.
- स्‍थानिक लोकांनी दिलेल्‍या माहितीनूसार ही दुर्घटना रेल्‍वे ट्रॅक तूटल्‍यामुळे झाली. मात्र चित्रकूटचे डीएम शिवाकांत द्विवेदी यांनी दुर्घटनेचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही, अशी माहिती दिली आहे.

 

रेल्‍वेतर्फे जाहीर करण्‍यात आलेले हेल्‍पलाइन नंबर 
- अलाहाबाद: (0532)- 2408149,2408128, 2407353
- मिर्जापुर: (05442)- 220095, 220096
- चुनार: (05443)- 222487,222137, 290049

 

 

या वर्षी उत्‍तर प्रदेशमध्‍ये घडलेली ही तिसरी घटना 
- यापूर्वी 20 ऑगस्‍ट रोजी मुजफ्फरनगरमध्‍ये खतौली रेल्‍वे स्‍टेशनजवळ पुरी-हरिद्वार एक्सप्रेसचे (उत्कल एक्सप्रेस) 12 डब्‍बे रुळावरुन घसरले होते. यात 23 जणांना जीव गमवावा लागला होता. 
- 7 डिसेंबरला हावडा येथून जबलपूरला जाणारी शक्‍तीपूंज एक्‍सप्रेस इंजिन आणि 6 डब्‍ब्‍यासह सोनभ्रदच्‍या फकराकूण्‍ड स्‍टेशनजवळ रुळावरुन घसरली होती. या दुर्घटनेत कोणीतीही जिवित हानी झाली नव्‍हती. 

 

उत्‍तर प्रदेशमध्‍ये दीड वर्षात झालेल्‍या मोठ्या रेल्‍वे दुर्घटना
- 20 फेब्रुवारी, 2017: कालिन्‍दी एक्‍सप्रेसचे 12 डब्‍बे टुंडला येथे रुळावरुन घसरले होते. 23 जणांचा मृत्‍यू झाला होता.
- 20 नोव्‍हेंबर, 2016: कानपूर येथे इंदूर-पटना एक्‍सप्रेस दुर्घटना. 121 जणांचा मृत्‍यू.
- 20 मार्च, 2016: रायबरेली येथे देहरादून-वाराणसी दुर्घटना. 32 जणांचा मृत्‍यू.
- 1 ऑक्‍टोबर, 2014: गोरखपूर येथे क्रॉसिंगवर दोन रेल्‍वेंची समोरासमोर टक्‍कर झाली होती. यात 14 जणांचा मृत्‍यू झाला होता. 

 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...