आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VASUNDHRA RAJE INDEPENDENCE DAY PROGRAM RAJASTHAN

चित्‍तथरारक कसरती: आगीशी खेळणारे स्‍टंटबाज पोलिसकर्मी, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गांधी मैदानावर स्‍टंट करताना पोलिसकर्मी)
उदयपूर( राज्‍यस्‍थान) - गांधी मैदानावर आयोजित स्‍वातंत्र्य दिवसाच्‍या निमित्‍ताने पोलिसकर्मींनी अतुलनीय स्‍टंट करत प्रेक्षकांची मने जिंकली. कुणी धगधगत्‍या आगीशी खेळले तर कोणी अफलातून मोटर स्‍टंट केली.
डेअर डेविल्‍सची चित्‍तथरारक घोडसवारी
समारोप समारंभामध्‍ये विविध राज्‍यांतून आलेल्‍या पोलिसकर्मींनी स्‍टंट केले. त्‍यामध्‍ये डेअर डेविल्‍सची घोडसवारी आकर्षणाचे केंद्र ठरली. अडथळ्यामध्‍ये घोड्याचा पाय अडकल्‍याने घोडस्‍वार जमीनीवर कोसळला परंतु चपळतेने तो पुन्‍हा घोड्यावर बसला आणि वा-याच्‍या वेगाने त्‍याने
अडथळा पार केला.
या कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा राजे यांच्‍या हातून राष्‍टध्‍वज फडकवून झाली. त्‍यानंतर परेड झाली. परेडनंतर सांस्‍कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्‍यांनी सादर केले.
माजी सैनिकांना नाही भेटली जागा
गांधी मैदानात संचलन पाहण्‍यासाठी आलेल्‍या माजी सैनिकांना जागा भेटली नाही. एवढी लोकांनी परेड पाहण्‍यासाठी गर्दी केली होती. माजी सैनिक कर्नल गुमानसिंह यांनी सांगितले की याविषयी आपण जिल्‍हाधिका-यांकडे तक्रार करणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍वातंत्र्यदिनी झालेल्‍या संचलनातील छायाचित्रे..