आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhra Raje Son Dushyant Singh And Jyotiraditya Scindia

हे आहेत CM वसुंधरा राजेंचे चिरंजीव दुष्यंत, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य यांचा घेतात सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुष्यंतसिह आणि ज्योतिरादित्य सिंधिया - Divya Marathi
दुष्यंतसिह आणि ज्योतिरादित्य सिंधिया
जयपूर - राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव खासदार दुष्यंतसिंह यांचा आज (11 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1973 साली मुंबईत झाला होता. दुष्यंत यांचे मामेभाऊ आहेत काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधी यांच्या कोअर टीमचे सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. विशेष म्हणजे हे दोघे भाऊ खासदार असून सभागृहात एक सत्ताधारी बाकांवर तर दुसरा विरोधकाच्या भूमिकेत असतो. दुष्यंतसिंह भलेही दुसऱ्या पक्षात असतील पण कोणतेही काम हाती घेण्याआधी ते ज्योतिरारादित्य सिंधिया यांचा सल्ला घेतात.
ज्योतिरादित्य सिंधिया, दुष्यंत यांचे मामा दिवंगत माधवराव सिंधिया यांचे चिरंजीव आहेत. दोघांचे बालपण सिंधिया घराण्याचे ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेस मध्ये गेले. आजी विजयाराजे सिंधिया यांच्या देखरेखीत दुष्यंतसिंह मोठे झाले. ज्योतिरादित्य सिंधिया दुष्यंत यांच्यापेक्षा आडीच वर्षांनी मोठे आहेत. दुष्यंतसिंह यांनी पदवी शिक्षण सेंट स्टिफन कॉलेजमधून पूर्ण केले. पदव्यूत्तर शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. तेथील एका कॉलेजमधून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
2004 ला प्रथम खासदार
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुष्यंतसिंह यांनी 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. त्यांना कार कलेक्शनचा छंद आहे. त्यांच्याकडे 1934 ची लँसिया डिलांबा कार आहे.त्यासोबतच त्यांच्या कलेक्श्नमध्ये चार रोल्स रॉइस आहेत. त्यात 1928 च्या दोन फँटम आणि दोन सिल्व्हर घोस्ट आहेत आणि 1923 ची एचपी आहे. खासदार होण्याआधीच दुष्यंत यांचा विवाह 2000 मध्ये राजस्थानमधील एका राजघराण्याची राजकुमारी निहारिकासोबत झाला. त्यांना दोन मुले आहेत.
दिल्लीतील महालातही असतो मुक्काम
माधवराव सिंधिया आणि राजीव गांधी हे चांगले मित्र होते. माधवराव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ज्योतिरादित्य आणि दुष्यंत हे त्यांच्यासोबतच राहात होते. याच काळात त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. दुष्यंत आणि ज्योतिरादित्य मुंबईतही सोबत राहात होते. आज भलेही दोघे भाऊ वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातील नात्यावर त्याचा परिणाम कधी दिसलेला नाही. मीडिया रिपोर्टनूसार माधवराव सिंधियांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य महत्त्वाच्या कामांसाठी आत्या आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे व दुसऱ्या आत्या मध्यप्रदेशच्या मंत्री यशोधरा राजे यांचा वडिलकीचा सल्ला घेतात.
सिंधिया कुटुंब सुट्यांमध्ये येतात एकत्र
सिंधिया कुटुंब राजकारणात एकमेकांच्या विरोधात असले तरी त्याचा त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. कुटुंबातील सर्वजण वर्षातून एकदा काही दिवस एकत्र सुटी एंजॉय करतात. ही परंपरा कित्येक दशाकांपासून चालत आली असून नवी पिढीही तिचे पालन करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुष्यंतसिंह यांचे कुटुंबिय...