आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरूंच्या मुलाच्या विवाहासाठी कर्मचाऱ्यांकडून उकळली रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - जोधपूरच्या नॅशनल लॉ विद्यापीठाच्या कुलगुरू पूनम सक्सेना यांच्या मुलाचा विवाह होता. विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरूंना खुश करण्यासाठी फॅकल्टीसाठी नोटीस जारी केली. प्रत्येक शिक्षकाकडून ५०० रुपये जमा केले. ५० शिक्षकांकडून २५ हजार रुपये जमा करण्यात आले. या पैशातून कुलगुरूंच्या मुलाला चांदीच्या दागिन्यांचा सेट भेट स्वरूपात दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनी नोटिशीविषयी अनभिज्ञता दाखवली. भेटवस्तूसाठी काही आदेश जारी झाल्याची कल्पना आपल्याला नसल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे. आपण त्या वेळी सुटीवर असल्याचा खुलासा प्रो. सक्सेना यांनी केला.

पूनम सक्सेना यांचा मुलगा निपुणचा विवाह १२ मार्च रोजी दिल्लीत झाला. फॅकल्टी सचिव रोशमी जॉन यांनी ८ मार्च रोजी सर्व सदस्यांना पत्र पाठवले. प्रत्येकी ५०० रुपये देण्याचे आवाहन याद्वारे केले होते. हे पैसे १० मार्चपर्यंत डॉ. आर. एन. अग्रवाल यांच्याकडे जमा करण्याचे यात सांगितले होते. या पत्राची प्रत कुलसचिव सोहनलाल शर्मा यांना दिल्याचा उल्लेखही यात होता. २५ हजार जमा झाल्यानंतर सरदारपुरा येथील एका ज्वेलर्सकडून सेट खरेदी करण्यात आला. कुलगुरूंच्या मुलाच्या लग्नात तो सेट भेट करण्यात आला.
आदेशही जारी
फॅकल्टी सचिव रोशमी जॉन यांनी सांगितले की, मी हा आदेश कुलसचिव सोहनलाल शर्मा आणि फॅकल्टी ऑफ लॉचे डीन प्रो. आयपी मॅसी यांच्या सांगण्यावरून तयार केला, तर कुलसचिव शर्मा यांनी म्हटले आहे की, याविषयी काहीच माहिती नाही. ज्यांनी जारी केलाय त्यांनाच विचारावे.
बातम्या आणखी आहेत...