आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीणाची \'सिल्क जवानी\' पाहाण्यासाठी दक्षिणेत गर्दी, श्रीराम सेना भडकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकचा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट (कन्नड) चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून तो वादग्रस्त ठरला आहे. वीणाचा 'सिल्क सक्कत हॉट' हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी 50 चित्रपटगृहांमध्ये 140 स्क्रीन्सवर एकाचवेळी प्रदर्शित झाला आहे. कन्नड भाषेतील चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणात सहसा प्रदर्शित होत नाही. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी आता या चित्रपटावरून वाद सुरू झाले आहेत.

या चित्रपटात वीणाने अतिशय बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यामुळे हिंदू संघटनांनी या चित्रपटाविरोधात मोर्चा उघडला आहे. हुबळी, बेळगाव, मंगळुर आणि म्हैसूर या शहरांमध्ये या चित्रपटाला मोठा विरोध होत आहे.

चित्रपटाला विरोध का होत आहे? हिंदू संघटनांनी यावर का बहिष्कार घातला, हे समजण्यापलिकडचे असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक त्रिशूळ यांनी म्हटले आहे. एकीकडे आपण पाकिस्तानसोबत सांस्कृतिक संबंध वाढविण्याचा प्रयत्न करित असतो. एक पाकिस्तानी कलाकार या चित्रपटात आहे म्हणून चित्रपटाला होत असलेला विरोध चूकीचा असल्याचे त्रिशूळ यांनी म्हटले आहे. या विरोधामुळे वीणा मलिकही दुःखी असल्याचे त्यांनी सांगितले.